मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून आंतरदेशीय विमान वाहतूकीसाठी आग्रह धरला जात होता, आता राज्य सरकारने प्रतिदिनी २५ उड्डाणांना मुंबईसाठी मान्यता दिली आहे.
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार त्यांची विमानतळे आता खुली करणार असून दररोज मुंबईतून २५ उड्डाणे नियमित होतील. राज्यात ५० हजारांवर कोरोनाबाधित असून त्यातही मुंबईतील ही संख्या मोठी असल्याने राज्य सरकार विमानसेवेबाबत अनुकूल नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यास होकार दर्शवल्यानंतर या विमानसेवेची राज्यातून सुरवात होणार आहे. देशांतर्गत विमान उड्डाणाची तयारी यापूर्वीच देशातील इतर राज्यांनी दाखवली होती. महाराष्ट्राने मात्र हा निर्णय राखून ठेवला होता.











