लॉकडाऊनमुळे आर्थिक गर्तेत गेलेल्या रिक्षाचालकांना मानधन द्या
दौंड : महान्यूज लाईव्ह
रिक्षा चालकांच्या मागण्याच्या सकारात्मक विचार करून त्यांना आर्थिक मानधन द्या अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
संपूर्ण राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यामध्ये तीन चाकी रिक्षा चालकांचा देखील समावेश आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण राज्यातील रिक्षा चालकांच्या समोर आर्थिक नियोजनाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे यासंदर्भात दौंड रिक्षा महासंघ, छत्रपती शाहू महाराज पॅजो, अॅप्पे परवानाधारक संघटना, दौंड, जि. पुणे व भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना, बारामती यांचे निवेदन आमदार कुल यांना प्राप्त झाले.
संदर्भीय दोन्ही निवेदनाचा सहभूतीपुर्वक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे आमदार कुल यांनी केली आहे.











