• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिग ब्रेकिंग : राज्यात म्युकरमायकॉसीसचे दोन हजार रुग्ण! बारामतीतही वर्षभरात रूग्ण आढळले आहेत! सरकार आताच याकडे गांभीर्याने पाहू लागले!

Maha News Live by Maha News Live
May 13, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

कोरोना वर उपचार घेताना ज्या रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडली आणि जे रुग्ण त्यातून बरे झाले, त्यांना काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले आहे, मात्र आता ही संख्या वाढत असून, सध्या अशा रुग्णांची संख्या राज्यात दोन हजारावर असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान काळ्या बुरशीचे रुग्ण पहिल्या लाटेपासूनच आढळत असल्याचे तज्ञांनी सांगितले असून, अगदी बारामतीत देखील पहिल्या लाटेपासून आतापर्यंत अंदाजे 20 रुग्णांना अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती खुद्द वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली आहे.

राज्यामध्ये काळ्या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल दोन हजारावर असल्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काळ्या बुरशीबाबत गांभीर्याने चर्चा केली जात आहे. परंतु काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव हा मागील वर्षाच्या नोव्हेंबर डिसेंबर पासून सुरू असल्याची माहिती खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. फक्त याविषयी उपचाराची कोणतीही वेगळी मार्गदर्शक सूचना नसल्याने काही रुग्ण तसेच नेहमीच्या पद्धतीने बरे होत आहेत, तर काही रुग्णांना जीव गमवावा लागत आहे अशीही माहिती खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

दरम्यान आता सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असल्याने, यावरती उपाय योजना सुरू होतील अशी चर्चा वैद्यकीय तज्ञ करत आहेत. दरम्यान बारामतीत देखील मागील दोन आठवड्यापासून तीन रुग्णांना म्युकर मायकॉसिस चा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.

अर्थात यामध्ये शास्त्रीय नोंद केलेली नाही. आलेल्या रुग्णांच्या लक्षणे व माहितीप्रमाणे त्याचा तर्क लावला असून, त्याची स्वतंत्र नोंद करण्यात आलेली नाही असेही काळे यांनी सांगितले. यापैकी काही रुग्णांवर बारामतीत उपचार करून पुण्याला पाठवण्यात आले होते अशी माहिती देखील त्यांनी दिली.

म्युकर मायकॉसिसची बारामतीत नोंद नाही; परंतु काळजी घेण्याची गरज : डॉ. खोमणे

दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी बारामतीत अद्याप म्युकरमायकॉसिस चा रुग्ण आढळल्याची नोंद आमच्याकडे नाही असे स्पष्ट केले, अर्थात राज्यात आढळत असलेल्या काळ्या बुरशीच्या या रुग्णसंख्येचा विचार करता बारामतीत देखील काळजी घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

यासाठी दवाखान्यांमध्ये ऑक्सीजनवर किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाच्या ह्युमिडीफाईर मध्ये फक्त डिस्टिल्ड वॉटर भरावे, साधे पाणी भरू नये, कारण साध्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असतात व तेच पुन्हा बुरशी मध्ये परावर्तित होऊ शकतात. तसेच जे डिस्टिल्ड वॉटर भरले जात आहे, ते नियमित व सातत्याने बदलत जावे, जेणेकरून बुरशी श्वासावाटे जाणार नाही व काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या येथे टाळता येऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले. (It’s our observation that the humidifier bottle attached to oxygen tube is filled with water and in most centers , use non sterile tap water which contains lots of microorganisms.)

Tags: BaramatiCoronagovernment of Maharashtramucor micosis
Next Post

दूर्दैवी : विद्युत रोहित्रावर काम करताना वीज कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group