• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या लढ्यासाठी मनुष्यबळासह आर्थिक कमतरता असल्यास तातडीने मागणी करा : उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

Maha News Live by Maha News Live
May 15, 2020
in राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
कोरोनाच्या लढ्यासाठी मनुष्यबळासह आर्थिक कमतरता असल्यास तातडीने मागणी करा  : उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

कोरोनाचे संकट दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी

पुणे : महान्यूज लाईव्ह

कोरोनाचे संकट दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्‍न करण्‍याचे आदेश उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनाच्‍या संकटाचा सामना करताना आर्थिक अथवा मनुष्‍यबळाच्‍या अडचणी असतील तर त्‍याबाबत स्‍पष्‍टपणे मागणी करण्याच्या सूचना त्‍यांनी केली.

             जिल्‍ह्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्‍ये बैठक घेतली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, मुख्‍य अभियंता एस.एस. साळुंके आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्‍यमंत्री श्री. पवार यांनी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग, जिल्‍हा परिषद यांचा विस्‍तृत आढावा घेतला. पुणे जिल्‍ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्‍या परराज्‍यातील मजुरांना त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या राज्‍यात परत पाठविण्‍यासाठी राज्‍यनिहाय समन्‍वय अधिकारी नेमण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या.  कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय योजण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला असून सार्वजनिक आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही ते  म्‍हणाले.

            आगामी काळात मान्‍सूनचे आगमन होणार आहे.  कोरोनाशी मुकाबला करतांना मान्‍सूनपूर्व स्‍वच्‍छतेच्‍या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही उपमुख्‍यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका यांनी त्‍याबाबत आवश्‍यक ती दक्षता घ्‍यावी. खरीप हंगामाचा उल्‍लेख करुन उपमुख्‍यमंत्री श्री पवार यांनी शेतक-यांना बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना केल्या. येत्‍या सोमवारपासून बाजार समित्‍या सुरु करण्‍यात याव्‍यात, असेही त्‍यांनी सांगितले.

            पुणे महापालिकेच्‍या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्‍याने तेथे अटी-शर्तींच्‍या अधीन राहून उद्योग सुरु करण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. उद्योग किंवा औद्योगिक आस्‍थापनांच्‍या प्रमुखांना कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्‍यांची निवास व्‍यवस्‍था, मास्‍कचा वापर याबाबत आवश्‍यक ते निर्देश देण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी केल्या.

            विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागाची, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्‍ह्याची माहिती दिली.  आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍यावतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी ससून हॉस्‍पीटलमधील उपलब्‍ध मनुष्‍यबळ, साधनसामुग्री, डॉक्टर-परिचारिका यांच्‍या भरतीबाबत माहिती दिली.

            पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनीही त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आलेल्या  जबाबदारीबाबत तसेच करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Tags: Ajit PawarCorona VirusMahavikas AaghadiMeetingPune DistrictStayHomeStaySafe
Next Post
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group