दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटर मध्ये केलेल्या तपासणीत आज प्राप्त झालेल्या अहवालात दौंड शहरासह ग्रामीण भागात तब्बल 90 तर तालुक्यातील यवत, वरवंड आणि स्वामी चिंचोली येथील कोवीड केअर सेंटरमध्ये विविध तपासणीत 54 जण कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दौंड शहरासह ग्रामीण भागात आज दिवसभरात प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात तब्बल 144 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
यवत, वरवंड आणि स्वामी चिंचोली या तिन्ही ही कोवीड केअर सेंटर मध्ये आज खुटबाव चार, पारगाव एक , आलेगाव एक, केडगाव दहा, पडवी दोन, भांडगाव तीन , देलवडी एक , भरतगाव चार, राहु तीन , पाटस दोन, यवत आठ , खामगाव तीन, वाळकी एक , वरवंड दोन, लिंगाळी तीन, गार एक, कुरकुंभ दोन, देऊळगाव राजे दोन या गावात 54 नव्याने कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत, ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांनी दिली.
तसेच दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटर मध्ये 316 संशयित रुग्णांची रॅपिड तपासणी केली यामध्ये 90 रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील सरपंच वस्ती, पासलकर वस्ती, पंचशील थिएटर, गांधी चौक, जनता कॉलनी, बांगला साईड यादव वस्ती , भैरवनाथ वस्ती, विठ्ठल मंदिर , भेंडे मिशन हॉस्पिटल, वडार गल्ली, देवकी नगर, भोईटे नगर, आर बी एन ऑफिस , शिवाजीनगर रेल्वे कॉटर,स्टेट बँक, कुंभार गल्ली, समता नगर ,नव गिरी वस्ती, बालाजी नगर, नेअर संभाजी मंदिर, शालिमार चौक, गणेश सोसायटी, इरिगेशन कॉलनी ,एस आर पी ग्रुप 5 , गोल राऊंड, विठ्ठल नगर, तसेच ग्रामीण भागातील गोपाळवाडी ,पाटस,नानविज ,टाकळी ,गार ,गिरिम ,रोटी सोनवडी, वडगाव ,बोरीबेल ,शिरापूर असे तब्बल 90 जण कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत ही माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली.











