भिगवण : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदापूर तालुक्यात कोरोनाने पहिला बळी गेला असून या महिलेच्या नातेवाईकांसह संपर्कातील सर्वांचे कोरोना चाचणीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने भिगवण व परिसरातील गावांची चिंता वाढली होती. आज या महिला रुग्णाचा उपचादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस न्यूमोनिया होता. भिगवण येथील दोन दवाखान्यांमध्ये अगोदर तिच्यावर उपचार झाले होते. त्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान या महिलेच्या कुटुंबातील चार जणांसह दोन्ही दवाखान्यांतील १४ जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने प्रशासन चक्रावले आहे. या महिलेस कोरोनाची लागण नेमकी कशी झाली व कुठे झाली याबाबत संभ्रम असल्याने आता प्रशासनही सतर्क झाले आहे. भिगवण स्टेशनमध्ये रुग्ण सापडल्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सर्वेक्षणास सुरवात करण्यात आली आहे.











Nice
Live