बारामती : महान्यूज लाईव्ह
तब्बल 14 गुन्हे केलेली लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद झाली. याच टोळीतील प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने याने पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये वडगाव निंबाळकरचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे थोडक्यात बचावले, पण पोलीस पथकाने ही टोळी शेवटी पकडली. पप्पू उर्फ सुहास सोनवलकर व प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने हे दोघे अटल चोर मात्र फरार झाले.
कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 ऑगस्ट 2020 रोजी बालाजी ज्वेलर्स या संजय किसन निकम यांच्या सराफ दुकानांमध्ये पाच जण आरोपी आले हे आरोपी पोलिसांच्या गणवेशात होते त्यांनी बालाजी ज्वेलर्सचे मालक निकम यांना चोरांकडून तुम्ही सात ग्रॅम सोने घेतले आहे ते सोने परत देणार की आमच्या सोबत पुण्याला येणार असे म्हणत त्यांनी निकम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व 34.5 तोळे सोन्याचे दागिने एक मोबाईल फोन असा 17 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला त्यावेळी स्थानिक नागरिकांना थोडासा संशय आल्याने लोकांनी पाठलाग केला तेव्हा नागरिकांच्या दिशेने या पाच जणांनी गोळीबार करून नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी आठ जुलै 2020 रोजी नीरा गावातील चितळे शॉपी दुकानाच्या आत प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहाण्याने डोक्यावर रिवाल्वर लावून सोन्याची चेन सोन्याची अंगठी रोख रक्कम व मोबाईल असा 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून स्विफ्ट कार मधून पलायन केले होते आणखी एक गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला 26 ऑक्टोबर 2020 रोजी सराफ व्यवसायिक अमर रंगनाथ कुलथे यांच्या पळशी येथील अमर ज्वेलर्स दुकानातून खुलते हे घरी जात असताना तोंडावर मिरची पावडर टाकून तीन जणांनी बजाज पल्सर दुचाकीवर येऊन अकरा तोळे सोने व दहा किलो चांदी असा 11 लाख 65 हजार रुपयांचा दागिन्यांचा ऐवज असलेली बॅग जबरीने पळवून नेली होती तर नीरा गावात ॲमेझॉन कंपनीचे स्टोअर फोडून त्यातून मोबाईल फोन डीव्हीआर रोख रक्कम असा 77 हजार 496 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
हे सर्व गुन्हे गंभीर असल्याने व लोकांमध्ये दहशत असल्याने पोलिसांनी या टोळीला पकडण्याचा चंग बांधला. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तैनात केले होते व घनवट यांना सूचना दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक शिवाजी ननवरे, अमोल गोरे, सोमनाथ लांडे, श्री शेलार, श्री कवितके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, उमाकांत कुंजीर, अजित काळे, रविराज कोकरे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश पिंगळे, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धीरज जाधव, श्री सीताफ, चेतन पाटील, सुनील कोळी, समाधान नाईक नवरे दगडू वीरकर अक्षय जावळे आदींचे पथक तयार करून समांतर तपास सुरू झाला होता.
दीडशे किलोमीटर परिसरातील दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे
पोलिसांनी याचा तपास करताना या परिसरातील दीडशे किलोमीटर अंतराचा मागे घेतला यामध्ये परिसरातील 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयितांचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबऱ्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली होती. मात्र आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांनी आपल्या पडू नये यासाठी बरीच काळजी घेत होते, मात्र जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेला महाल चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे व शाम शिराज मुळे हे वापरत आहेत अशी माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यावरून वाघळवाडी येथून संशयित मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
त्यावेळी केलेल्या तपासात चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (रा. ढवळ ता. फलटण जि. सातारा) याने त्याचे साथीदार शाम शशीराज मुळेसध्या (रा. सिटी सोसायटी नीरा), निलेश बाळासाहेब निकाळजे (सोनगाव बंगला ता. फलटण), अक्षय विलास खोमणे (रा. कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती), राहुल पांडुरंग तांबे (रा. जेऊर ता. पुरंदर), प्रवीण प्रल्हाद राऊत (रा. चिखली तालुका इंदापूर), पप्पू उर्फ सुहास सोनवलकर (रा. वडले तालुका फलटण), प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने (रा. तामसवाडी ता. माळशिरस) या सर्वांनी मिळून चोऱ्या केल्याचे लोखंडे यांनी कबूल केले. यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अक्षय विलास खोमणे निलेश बाळासाहेब निकाळजे व राहुल पांडुरंग तांबे यांना अटक केली.
यानंतर 29 नोव्हेंबर रोजी पप्पू उर्फ सुहास सोनवलकर प्रमोद उर्फ आप्पा नंदू माने व प्रवीण प्रल्हाद राऊत हे वडले तालुका फलटण येथे असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी जाऊन पोलिस पथकाने प्रवीण प्रल्हाद राऊत यास ताब्यात घेतले मात्र पप्पू सोनवलकर व प्रमोद माने यांचा पाटला करीत असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून करून उसाच्या शेतात पळून गेले या दोघांचाही सध्या शोध सुरू आहे मात्र तब्बल 14 गुन्हे यात आरोपींनी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत होणार कारवाई
यासर्व टोळीने सोलापूर कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी देखील जबरी चोरीचे गुन्हे दाखल गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून इतर ठिकाणीही यांनी दरोडे व चोऱ्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना संघटित गुन्हेगारांची टोळी तयार केल्याबद्दल व गुन्हे तयार केल्याबद्दल महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक विनायक वेताळ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.











