• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चक्क रात्री अकराच्या सुमारास ढेकळवाडीकरांचा सणसरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा..!

tdadmin by tdadmin
May 24, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
चक्क रात्री अकराच्या सुमारास ढेकळवाडीकरांचा सणसरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा..!

अतिरिक्त भारनियमनामुळे संतप्त शेतकरी, युवकांचा इशारा; “मनमानी थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरू”

भवानीनगर : महान्यूज लाईव्ह

वाढत्या भारनियमनामुळे संतापलेल्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी परिसरातील शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी शनिवारी रात्री थेट इंदापूर तालुक्यातील सणसर येथील महावितरण कार्यालय गाठत तीव्र संताप व्यक्त केला. रात्री तब्बल अकरा वाजता नागरिकांनी कार्यालयासमोर जमून अधिकाऱ्यांना जाब विचारला. “आम्ही भारनियमन सहन करतोय, पण महावितरणाची ही मनमानी किती दिवस सहन करायची?” असा सवाल यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला.

दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतचे भारनियमन नागरिकांनी नाईलाजाने स्वीकारले. मात्र, त्यानंतरही विविध कारणे सांगत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. शनिवारी रात्री दहा वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा अकराच्या सुमारास वीज गायब झाली आणि त्यानंतर ढेकळवाडी परिसरातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.

बारामती तालुका बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे यांच्यासह अनेक शेतकरी आणि युवक थेट सणसर येथील महावितरण कार्यालयात दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधून विचारणा करण्यात आली असता “वरून लोडशेडिंग आहे, आम्ही काही करू शकत नाही” अशी उत्तरे देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या संतप्त वातावरणात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. “लहान मुले, आजारी नागरिक, वयोवृद्ध व्यक्ती उकाड्यामुळे त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा ते दहा वाजेपर्यंतचे भारनियमन आम्हाला मान्य नसले तरी नाईलाजाने सहन करतो; पण त्यानंतरही रात्री अकरा-अकराला वीज घालवून नागरिकांना वेठीस धरणे थांबवा,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर अखेर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या युवकांनी महावितरणाला थेट इशारा दिला. “सततची मनमानी आणि अतिरिक्त भारनियमन सुरूच राहिले तर आम्ही रात्री अपरात्री महावितरण कार्यालयात येऊन बसू. वीज घालवली की आम्हीही कार्यालयात हजर राहू,” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

महावितरणाच्या कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी, युवक, माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. “महावितरणाने तातडीने परिस्थिती सुधारावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group