दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, तथागत गौतम बुद्ध व पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन गुरुवार, २२ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माजी खासदार छत्रपती संभाजीराजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या जयंती सोहळ्यास पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक राहुल दिवेकर, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंददादा थोरात, ‘नटसम्राट’चे दिग्दर्शक- लेखक कुमार अहेर, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात, अविनाश कुदळे, साहेबराव पोळ, डॉ. गायत्री खळदकर, अनुराधा शितोळे, सागर शेलार आदी उपस्थित राहतील.
महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम व समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या संयुक्त जयंती सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











