दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहर व यवत येथील कोवीड सेंटर मध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 8 जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. शहरातील कोवीड सेंटर मध्ये आज बुधवारी ( दि. 7 ) आज प्राप्त झालेल्या अहवालात 118 पैकी 5 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 113 जणांचे निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये 29 ते 49 वयोगटातील 1 महिला व 4 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड शहारात 2, राज्य राखीव दल गट क्रमांक पाच मध्ये 2 व ग्रामीण भागात 1 असे एकूण 5 रूग्ण आढळले, अशी माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
यवत येथील कोवीड सेंटर मध्ये आज 48 जणांची तपासणी केली यापैकी तीन जणांचा अहवाल पाँझिटिव्ह प्राप्त झाला आहे, २१ ते ४० वयोगटातील दोन पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे. यवत, खुटबाव, खामगाव या गावात प्रत्येकी एक असे तीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत ही माहिती यवत ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ शशिकांत इरवाडकर यांनी दिली.











