बारामती : महान्यूज लाईव्ह
एक महिला स्वत:च्या हिंमतीवर एखादा व्यवसाय उभा करते, त्यावेळी तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील एक आव्हान असते ती म्हणजे आपल्या व्यवसायासाठी नवनवीन ग्राहक मिळविणे. यासाठीच रागिणी परिवाराकडून बारामती परिसरासाठी मार्गदर्शिका तयार करण्यात येत आहे. या मार्गदर्शिकेत व्यवसायाची नोंदणी करून महिला हजारो ग्राहकांपर्यंत पोचू शकतात.
महिला चालवत असलेला कोणताही व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय यांची नोंद या मार्गदर्शिकेत घेतली जाणार आहे. या मार्गदर्शिकेचे वितरण बारामती शहर आणि परिसरात केले जाणार आहे. यातून या व्यवसायांसाठी अनेक नवे ग्राहक मिळू शकतात. याखेरीज बारामतीच्या वाढत्या शैक्षणिक सुविधांची माहिती बाहेरगावाहून बारामतीत शिक्षणासाठी येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनाही मार्गदर्शक ठरणार आहे. ब्युटीपार्लर, घरगुती मेस, फॅशन डिझायनिंग, मेहंदी क्लासेस, स्पर्धापरिक्षा, कला आणि क्रिडा प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस यासह अनेक व्यवसायांसाठी ही मार्गदर्शिका उपयोगी पडणार आहे.
रागिणी परिवाराचा शिक्षण क्षेत्र आणि महिलांसाठीचा हा सामाजिक उपक्रम आहे. या मार्गदर्शिकेत नोंदणी विनामुल्य आहे. सविस्तर माहिती सोबतच्या लिंकवर. https://youtu.be/9niut48K_DE?si=qZGnN-CprO5ODM-Y 🙏 रागिणी बारामती मार्गदर्शिकेसाठी या लिंकवर जाऊन नोंदणी करा https://forms.gle/GLLk3vyeQSi8Ff1T6 अधिक माहितीसाठी ९८८१०९८१३८ किंवा 91461 77645 या क्रमांकावर संपर्क करा. या मार्गदर्शिकेत नोंदणीसाठी १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यापूर्वीच नोंदणी करावी ही विनंती.











