इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज चारजणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तीनजण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील असून जंक्शन येथे नव्याने एक रुग्ण सापडल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
इंदापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये इंदापूर न्यायालयातील एक कर्मचारी असून बावडा, पळसदेव आणि जंक्शन येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील तिघेजण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. तर जंक्शन येथे मात्र नव्याने रुग्ण सापडला आहे.
इंदापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरीकांनी स्वत:हून दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











