बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा युवा नेते जय पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोन अग्निशमन संच भेट देण्यात आले. काटेवाडीचे उपसरपंच समीर मुलाणी यांच्या वतीने हे संच भेट देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रा. हेमंत सुपेकर, योद्धा स्पोर्टस क्लबचे साहेबराव ओहोळ, पत्रकार नविद पठाण यांच्या हस्ते हे अग्निशमन संच बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी समीर मुलाणी यांनी अग्निशमन संच भेट देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच आगामी काळातही सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी अग्निशमन संच दिल्याबद्दल आभार मानत सध्याच्या काळात युवा वर्गाने सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.











