• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुदत संपली, न्यायालयाचाही आदेश, मात्र रंजन तावरेंना खुर्ची सुटेना..!

Maha News Live by Maha News Live
April 4, 2020
in राजकीय, शेती शिवार, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
मुदत संपली, न्यायालयाचाही आदेश, मात्र रंजन तावरेंना खुर्ची सुटेना..!

माळेगाव कारखान्याच्या नव्या संचालक मंडळाला रंजन तावरेंचा अडथळा.. माळेगावमधील वातावरण तणावग्रस्त..  

बारामती : महान्यूज लाईव्ह

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी गटाला नाकारत कारखान्यांची सूत्रे पुन्हा राष्ट्रवादीपुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलकडे सोपवली.. मात्र सत्तेतून पायउतार झालेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांना काही खुर्ची सुटत नसल्याचेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने आणि साखर आयुक्तांनी आज नव्या संचालक मंडळाकडे पदभार देण्याचे आदेश दिलेले असतानाही रंजन तावरे यांनी अडथळा निर्माण केला आहे. दुसरीकडे, राज्यभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू असतानाही रंजन तावरे यांच्या मनमानीमुळे कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली असून तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

 माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक २३ फेब्रुवारी रोजी झाली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यानंतर ८ मार्च रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३ एप्रिलपर्यंत असल्याने मुदतवाढ देण्यासाठी दाद मागितली होती. त्यानुसार त्यांना ३ एप्रिलपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता पदावर राहण्याची मुभा न्यायालयाकडून मिळाली होती.

उच्च न्यायालयात रंजन तावरे यांनी पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळून लावत न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी नवीन संचालक मंडळाकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी साखर आयुक्तांनीही पदभार नवीन संचालक मंडळाकडे देण्याचे आदेश देतानाच मागील काळात झालेल्या नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे आणि सर्वच संचालक मंडळ आज पदभार स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी त्यांना आडकाठी निर्माण केली. सभासदांनी सत्तेतून पायउतार केल्यानंतरही रंजन तावरे हे आपणच अध्यक्ष असून आपली मुदत संपली नसल्याचा दावा करीत नवीन संचालक मंडळाला विरोध करू लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या राज्यभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू आहे. अशा स्थितीत रंजन तावरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे कारखान्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे.    

..तर अशी वेळच आली नसती : बाळासाहेब तावरे

दरम्यान, आम्ही उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांच्या आदेशानुसार पदभार स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्याकडून मुदत संपली नसल्याचा हास्यास्पद दावा करण्यात आला. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संपूर्ण प्रशासन आणि नवीन संचालक मंडळाला वेठीस धरण्यात आले. हा संपूर्ण प्रकार निषेधार्ह असल्याचे नमूद करत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी मागील काळात चांगला कारभार केला असता, तर अशा पद्धतीने खुर्चीसाठी कांगावा करून रडीचा डाव खेळण्याची वेळच आली नसती असा टोला रंजन तावरे यांना लगावला आहे.

हा खटाटोप कशासाठी..? : योगेश जगताप

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी नाकारल्यानंतर पराभव स्वीकारून नव्याने सत्तेत आलेल्या संचालक मंडळाला सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी माजी अध्यक्षांनी केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी न्यायालयीन दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही दिलेली मुदतही आज संपली असताना हा सर्व खटाटोप नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करून संचालक योगेश जगताप म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसारच नवीन संचालक मंडळ आजपासून पदभार स्वीकारण्यासाठी कारखान्यावर दाखल झाले आहे.  असे असताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून माजी अध्यक्ष विनाकारण प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत.

Tags: योगेश जगतापन्यायालयीन आदेशमाळेगाव कारखानामाळेगाव तणावग्रस्तरंजन तावरेबाळासाहेब तावरेपदभार
Next Post
#Corona_Virus : महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’ साठी घराबाहेर पडू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

#Corona_Virus : महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’ साठी घराबाहेर पडू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group