इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मागील वर्षीच्या मार्च पासून ते आजपर्यंत पुणे जिल्ह्यात इंदापूर व बारामती तालुक्यातच कोरोनाचे प्रमाण अधिक होते आणि आजही आहे. काल इंदापूर तालुक्यात मोठा शेतकरी मेळावा झाला. त्याला प्रचंड गर्दी झाली, मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात चोवीस रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. म्हणजेच कोरोना आहे, तिथेच आहे, फक्त रुग्ण बाहेर पडत नाहीत म्हणून लक्षात येत नाही.
दोन दिवसात इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचे 24 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये काल झालेल्या तपासणीमध्ये 72 जणांची तपासणी झाली. त्यामध्ये 12 जण कोरोना बाधित आढळून आले. या कोरोना बाधितांमध्ये इंदापूर शहरातील 17 वर्षीय मुलगी, वालचंदनगर येथील 31 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 50 वर्षीय महिला, 39 वर्षीय महिला, रेडा येथील 55 वर्षीय पुरुष, तक्रारवाडी येथील 55 वर्षीय महिला, भिगवण येथील 29 वर्षीय पुरुष, तक्रारवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 65 वर्षीय पुरुष, गोतंडी येथील 47 वर्षीय पुरुष, अकरा वर्षीय मुलगा, शिरसोली येथील 47 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
परवा इंदापूर तालुक्यात फक्त 56 जणांची तपासणी झाली. यामध्ये देखील 12 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये गोतंडी गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. परवा आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गोतंडी येथील 47 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, भरणेवाडी येथील अकरा वर्षीय मुलगी, भिगवण येथील 30 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 35 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 27 वर्षीय महिला, निमसाखर येथील 57 वर्षीय पुरुष, शेटफळगडे येथील 66 वर्षीय महिला, कौठळी येथील 30 वर्षीय पुरुष, वरकुटे खुर्द येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
फक्त पुणे जिल्ह्यातच कोरोना अधिक का?
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 654 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 500, सातारा जिल्ह्यात 63, सोलापूर जिल्ह्यात 64, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 14 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 755 आहे. पुणे जिल्हयामध्ये 628 ,सातारा जिल्हयामध्ये 56, सोलापूर जिल्हयामध्ये 52, सांगली जिल्हयामध्ये 14 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 5 रुग्णांचा समावेश आहे.










