दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात मागील काही दिवसापासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पाटस पोलीस चौकीतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून पाटस परिसरातील एकाच कुटूंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. मा
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला शिरकाव चिंतेचा विषय आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण तापु लागले आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा वाजू लागल्या आहेत. असे असतानाच मागील काही दिवसापासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने आता तालुक्यातील ग्रामिण भागात एन्ट्री केली आहे.
यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल हा पॅाझिटिव्ह आला. यामुळे या पोलीस कर्मचारी आणि पोलीस चौकीच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
तर पाटस परिसरातील एकाच कुटूंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याने पाटसकरांची ऎन निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चिंता वाढली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दौंड तहसील कार्यालयात निवडणुकीचे अर्ज भरणे, माघारी घेणे यासाठी तालुक्यातून आलेल्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याच गर्दीतून कोरोनाने रंग दाखवला असून पुन्हा तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग फोफवतो काय अशी भिती आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.











