बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या 25 जणांच्या तपासणीमध्ये 19 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर बारामती तालुक्यात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 10 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 60 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
शेटफळगढे येथील 65 वर्षीय पुरुष, कळस येथील 49 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 35 वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, घोरपडवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
काटी येथील 47 वर्षीय महिला, कळाशी येथील 15 वर्षीय मुलगा, इंदापूर शहरातील 40 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, 35 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, रेडा येथील 26 वर्षीय महिला, वरकुटे बुद्रुक येथील 27 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कालच्या 19 रुग्णानंतर आज बारामतीतील आकडा मंदावला
बारामती मध्ये काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये नागवडे वस्ती येथील चाळीस वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील बारा वर्षीय मुलगा, चाळीस वर्षे पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 51 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या रॅपिड चाचणीत पणदरे येथील 22 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वानेवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 42 वर्षीय पुरुष व उंडवडी सुपे येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत सिद्धेश्वर निंबोडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा आढळून आली आहे.











