इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 19 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर बारामती तालुक्यात काल झालेल्या तपासण्यांमध्ये काल प्रमाणेच आजही स्थिती आहे.
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जाचकवस्ती येथील 34 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, भवानीनगर येथील 34 वर्षीय पुरुष, सपकळवाडी येथील 79 वर्षीय पुरुष, पोंदकुले वाडी येथील 21 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 56 वर्षीय पुरुष रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
लासुर्णे येथील 45 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील 34 वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील 55 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 44 वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील 49 वर्षीय पुरुष, सरडेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 54 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, कालठण नंबर 1 येथील 40 वर्षीय महिला, डाळज नंबर 1 येथील 56 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल प्रमाणेच आजही स्थिती
बारामतीत काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अशोकनगर येथील 46 वर्षीय पुरुष, रुई येथील 21 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 52 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील 42 वर्षीय पुरुष, साईनगर येथील 45 वर्षी पुरुष, निंबोडी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात काल तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वसंतनगर येथील 52 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड उत्कर्ष आयकॉन सिटी येथील 48 वर्षीय महिला, पणदरे येथील 51 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.











