• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भेसळमुक्त आहारासाठी पुण्यात ३० संघटनांचा एल्गार! संघटना म्हणाल्या, भेसळमुक्त अन्न हा आमचा घटनात्मक अधिकार!

tdadmin by tdadmin
May 16, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
भेसळमुक्त आहारासाठी पुण्यात ३० संघटनांचा एल्गार! संघटना म्हणाल्या, भेसळमुक्त अन्न हा आमचा घटनात्मक अधिकार!

सरकारकडे कठोर उपाययोजनांची मागणी

पुणे : महान्यूज लाईव्ह

पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी एकत्र येत भेसळमुक्त आहार हा नागरिकांचा मूलभूत व घटनात्मक अधिकार असल्याचा जोरदार एल्गार आज सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकात केला. राष्ट्रशक्ती संघटनेच्या पुढाकारातून आयोजित या आंदोलनात शहरातील सुमारे ३० सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेत सरकारच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी पुणे शहरातील अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ४५ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात अन्नधान्य व औषध प्रशासनाचे एकही स्वतंत्र कार्यालय नाही, ही अत्यंत निंदनीय बाब आहे, असे सांगत त्यांनी पुण्यात तात्काळ FDA कार्यालय सुरू करण्याची मागणी केली.
तसेच, ५० हजार लोकसंख्येमागे एक अन्नसुरक्षा अधिकारी आवश्यक असताना सध्या तब्बल ३ लाख लोकसंख्येमागे एक अधिकारी कार्यरत आहे. रिक्त पदे का भरली जात नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनादरम्यान ‘ॲनालॉग पनीर व चीज’च्या विक्रीवरही संताप व्यक्त करण्यात आला. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या उत्पादनांना केंद्र सरकारने परवानगी कशी दिली?” असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारने त्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, स्टिंगसारख्या ऊर्जा पेयांमधील कॅफिनचे प्रमाण धोकादायक असल्याचा आरोप करत अशा पेयांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या शीतपेयांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला मोबाईल अन्न तपासणी प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अन्न तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी, तसेच शहरातील पाणी व दूध तपासणीचे अहवाल दररोज सार्वजनिक करावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या. नशेच्या पदार्थांचा वाढता प्रसार आणि अल्पवयीन मुलांपर्यंत त्यांची सहज उपलब्धता यावरही आंदोलनकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. अमली पदार्थांच्या साखळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करून ती पूर्णतः उद्ध्वस्त करावी, अशी मागणी सर्व संघटनांनी केली.

या आंदोलनावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी लवकरच अन्नधान्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन या मागण्यांबाबत पाठपुरावा करू. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही विषय मांडू, असे आश्वासन दिले. नगरसेवक महेश वाबळे यांनी भेसळविरोधी चळवळीला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

यावेळी नगरसेविका स्मिता कोंढरे, वीणा घोष, शैलजा भोसले यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात दक्षिण पुणे वकील संघटना, पुणे डॉक्टर असोसिएशन, पत्रकार संघ, माजी सैनिक संघ, संकल्प प्रतिष्ठान, कर्तव्यनिष्ठ महिला मंच आदी संघटनांचा सहभाग होता. राष्ट्रशक्ती संघटनेचे सचिव शहाजी आरसूळ यांनी प्रास्ताविक केले. आंदोलनाचे नियोजन सचिन कोळी, प्रमोद आरसूळ, पद्माकर कांबळे, सुहास जितकर, गोरख मानकर आणि क्षितिज मदनाल यांनी केले.

Next Post
पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; पावसाळा-खरीप हंगामाचाही परिणाम होण्याची शक्यता!

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओनंतर आता तृतीयपंथीय कल्याण मंडळावरील त्या तृतीयपंथीची नियुक्ती रद्द..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group