• Contact us
  • About us
Tuesday, May 12, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडमध्ये खळबळ! ज्येष्ठ मुद्रांक विक्रेते विवेक गटणे आत्महत्या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा

tdadmin by tdadmin
May 12, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंडमध्ये खळबळ! ज्येष्ठ मुद्रांक विक्रेते विवेक गटणे आत्महत्या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा

दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रसिद्ध मुद्रांक विक्रेते विवेक शंकर गटणे (वय ७२) यांच्या आत्महत्या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तब्बल १३ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दौंड शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा रंगू लागली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव गल्ली, दौंड येथील रहिवासी विवेक गटणे यांनी सोमवारी (११ मे) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका वहीत १३ जणांची नावे लिहून ठेवली होती. या व्यक्तींच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून मी माझे जीवन संपवत आहे, असा उल्लेख त्यांनी त्या वहीत केला असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी अद्वैत गटणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, आरोपींनी मागील वर्षभरापासून आमचे फायनान्स कंपनीतील कर्मचारी ओळखीचे आहेत असे सांगून विवेक गटणे यांच्याकडून वेळोवेळी पैसे, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र, त्या परत न करता उलट आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
संजय भिमराव बारवकर, अरीफ शमशुद्दीन शेख, प्रकाश आबाजी भालेराव, अख्तर अहमद शेख, आदित्य सुधीर जगताप, शंकर रमेश वाघमारे, राजू भीमराव बारवकर तसेच शितोळे, सोनवणे, चोप्रा, कुलकर्णी (मॅडम), शिंदे आणि मुल्ला (मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींची संपूर्ण नावे व पत्ते अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम करीत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विशेष म्हणजे, या गुन्ह्यात दौंडमधील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सावकार आणि काही उच्चभ्रू व्यक्तींची नावे समोर आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पोलीस तपासावर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपींना अटक होणार का?, तपास निष्पक्षपणे होणार का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची नावे समोर आल्याने पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group