• Contact us
  • About us
Tuesday, May 12, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे-दौंड डेमोच्या चाकांना पाटस स्थानकावर आग! मोठी दुर्घटना टळली, दीड तास प्रवासी खोळंबले!

tdadmin by tdadmin
May 12, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुणे-दौंड डेमोच्या चाकांना पाटस स्थानकावर आग! मोठी दुर्घटना टळली, दीड तास प्रवासी खोळंबले!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : पुणे-दौंड डेमो गाडीच्या चाकांना सोमवारी संध्याकाळी पाटस रेल्वे स्थानकात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी सुमारे एक ते दीड तास प्रवासी गाडीतच अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुणे वरुन दौंड ला जाणाऱ्या डेमो गाडी सोमवारी ( दि ११) संध्याकाळी ९ ,३० वाजण्याच्या आसपास डेमो गाडी पाटस रेल्वे स्थानकात आली असता, गाडीच्या एका डब्याच्या चाकांजवळून अचानक जाळ आणि धूर येऊ लागला. काही क्षणातच चाकांना आग लागल्याचे दिसून आले. स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने गाडी तात्काळ थांबवण्यात आली. आणि प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या मारुन रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर भयभीत प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही आग कशामुळे लागली हे मात्र समजु शकले नाही.
आग विझवण्यासाठी व तांत्रिक तपासणीसाठी गाडी तब्बल दीड तास स्थानकातच उभी होती. दरम्यान, दौंड येथे घराची ओढ लागलेल्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी गाडीतच आणि रेल्वे स्थानकावर लटकत राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची व इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

स्थानिक नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळीच आग विझवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, गाड्यांची योग्य देखभाल होत नसल्याने तसेच रेल्वे प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

‘देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची दिरंगाई यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन डेमो गाड्यांची तातडीने तपासणी करावी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक बाईंडिंगमुळे चाके गरम होऊन आग लागली असावी. रेल्वे विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group