• Contact us
  • About us
Tuesday, May 12, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गायब’ नाहीत, लोकांच्या बांधावर आहेत! महादेव जानकर यांचा मेंढ्यांच्या वाडग्यावर मुक्काम !

tdadmin by tdadmin
May 12, 2026
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
गायब’ नाहीत, लोकांच्या बांधावर आहेत! महादेव जानकर यांचा मेंढ्यांच्या वाडग्यावर मुक्काम !

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर सध्या कुठे आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना त्यांच्या साधेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. महादेव जानकर सध्या माण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून, रासप युवक नेते तात्याराम दडस यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर मुक्काम करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ते सध्या राज्यातील राजकारणापासून अलिप्त झाले आहेत का ? भाजप महायुतीतून बाहेर पडल्यानंतर जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष वाढीवर भर दिला आहे. पुन्हा एकदा पक्षवाढीसाठी राज्यातील सर्व सामान्य जनता आणि ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांमध्ये भटकंती करत असलेल्या आणि पक्षाचा बेस असलेल्या धनगर समाजाच्या तांड्यावर जानकर यांनी पुन्हा एकदा आपले लक्ष केंद्रित केले आहे.

पक्षाची पुन्हा एकदा नव्याने पुनर्बांधणी आणि नवीन कार्यकर्तृत्वाची भक्कम फळी उभी करण्याचा यामागचा जानकर यांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
कारण राजकारणात बडेजावपणाचे वलय सामान्य मानले जाते. मात्र, माजी मंत्री जानकर आजही आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहेत. पळसवडे (ता. माण) सारख्या छोट्या गावातून संघर्षाने उभे राहिलेले नेतृत्व पद व प्रतिष्ठा मिळूनही जुन्या सवयी विसरलेले नाही.

कार्यकर्त्यांच्या ओढीने जानकर हे तात्याराम दडस यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर पोहोचले. तिथेच त्यांनी साधे जेवण केले आणि वाड्यावरच रात्र काढली. सकाळी उठून पुन्हा ते आपल्या लोकसंपर्क दौऱ्यावर मार्गस्थ झाले. हा केवळ मुक्काम नसून, आपल्या लोकांशी आणि मातीशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ते स्वतः एक
अभियंता असूनही समाजाच्या उत्थानासाठी राजकारणाचा मार्ग निवडलेल्या जानकर यांचा गेल्या ४० वर्षांपासूनचा संघर्षमय प्रवास अविरत सुरू आहे.

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना राजकीय गुरू मानून त्यांनी राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि विशेषतः धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. आजही ते त्याच उत्साहाने सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात, वाड्यावर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत.

‘ना मोठेपणाची हाव, ना गोड बोलून नाटक’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. सत्ता असो वा नसो, त्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. आजच्या दिखाव्याच्या काळात जानकर हे ‘डाऊन टू अर्थ’ असणे कार्यकर्त्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. तात्याराम दडस यांच्या वाड्यावरचा हा मुक्काम म्हणजे केवळ दौरा नसून, समाजाप्रती असलेल्या अढळ निष्ठेचाच पुरावा आहे. त्यामुळे ‘जानकर गायब आहेत’ ही चर्चा चुकीची असून ते सध्या जनतेच्या दारात, वाड्यावर आणि बांधावर आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group