• Contact us
  • About us
Friday, May 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष म्हणून TVKलाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्या : ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

tdadmin by tdadmin
May 8, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष म्हणून TVKलाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्या : ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : महान्युज लाईव्ह

तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊन विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची संधी राज्यपालांनी द्यावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपाल विजय यांना “TVK कडे बहुमताचा आकडा नसल्याचा संशय” या कारणावरून सरकार स्थापनेसाठी बोलावण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 164 (2) नुसार विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासाठी त्यांनी यापूर्वीच्या दोन घटनांचा संदर्भ दिला आहे. 1989 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस (I) हा 194 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. तत्कालीन राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांनी प्रथम काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र राजीव गांधी यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर नॅशनल फ्रंटचे नेते व्ही. पी. सिंह यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आणि 2 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

तसेच 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्याने त्रिशंकू लोकसभा निर्माण झाली होती. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते आणि त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने 28 मे 1996 रोजी अविश्वास प्रस्तावादरम्यान 13 दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

याच पार्श्वभूमीवर, सर्वात मोठा पक्ष म्हणून TVK ला सरकार स्थापनेसाठी आणि विजय यांना तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विधिवत निमंत्रित करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

Next Post
जय पवार म्हणाले २०२९ ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हाव्यात! पण आमदार रोहित पवार म्हणाले, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावा लागेल..!

जय पवार म्हणाले २०२९ ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हाव्यात! पण आमदार रोहित पवार म्हणाले, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावा लागेल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group