• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण ! पाटस, केडगाव, दापोडीसह दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक!

tdadmin by tdadmin
May 4, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण ! पाटस, केडगाव, दापोडीसह दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : महावितरण कंपनीच्या अनियमित वीजपुरवठा आणि भारनियमनाला कंटाळून दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून पाटस, केडगाव, बोरीपार्धी व दापोडी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ४) बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तासंतास वीज नसल्यामुळे शेतीचे नियोजन बिघडत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर दापोडी येथील महावितरण कार्यालयासमोर अमोल भागवत, इब्राहिम शेख, अनिल नेवसे आणि प्रदीप शेलार या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केले आहे. २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा आणि भारनियमन तात्काळ रद्द करावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
तसेच दौंड व शिरूर परिसरातील भारनियमन पूर्णपणे बंद करावे आणि पाटस परिसरातील भानोबानगर, तामखडा, ठोंबरे वस्ती, केकाणवस्ती तसेच गावठाण भागात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार, रब्बी हंगाम तोंडावर असताना सायंकाळी ६ ते १० या अत्यावश्यक वेळेतच वीजपुरवठा खंडित होतो. दिवसा वीज नसल्याने शेतात काम करणे कठीण झाले आहे, तर वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत शेती तोट्यात जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, विविध शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून महावितरण प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Next Post
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग.. पाटस, वरवंड, वाखारी, भांडगाव बनले जीवघेण्या अपघातांचे केंद्र!

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग.. पाटस, वरवंड, वाखारी, भांडगाव बनले जीवघेण्या अपघातांचे केंद्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group