• Contact us
  • About us
Saturday, May 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदयद्रावक! नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; ६५ वर्षीय नराधमाला बेड्या!

tdadmin by tdadmin
May 2, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
हृदयद्रावक! नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; ६५ वर्षीय नराधमाला बेड्या!

नसरापूर (भोर): पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय नराधमाला अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका सुट्ट्यांच्या निमित्ताने नसरापूर येथील आपल्या आजीकडे आली होती. शुक्रवारी दुपारी ती घरासमोर खेळत असताना आरोपी भीमा कांबळे (वय 60 रा. साळवडे ता. भोर) याने तिला आमिष दाखवून जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर, तिने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने दगडाने तिचे डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.

मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने अखेर सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले. यामध्ये ६५ वर्षांचा आरोपी मुलीला सोबत घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. संशयावरून पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी संबंधित गोठ्याची झडती घेतली असता हा भयानक प्रकार उघडकीस आला.

नसरापूरमध्ये तणाव: महामार्गावर ‘रास्ता रोको’

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नसरापूर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. नराधम आरोपीला जागेवरच फाशीचीच शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी नसरापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवले आहे. “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत,” अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group