• Contact us
  • About us
Monday, May 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देहूरोडमध्ये गोळ्यांचा वर्षाव; भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची भररस्त्यात हत्या!

tdadmin by tdadmin
April 30, 2026
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
देहूरोडमध्ये गोळ्यांचा वर्षाव; भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची भररस्त्यात हत्या!

पुणे : महान्यूज लाईव्ह

पुण्याच्या देहूरोड परिसरात काल रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. भररस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मृत्यू झालेला तरुण हा भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी असल्याचे समोर आले असून या घटनेने गुन्हेगारीसह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार रात्री उशिरा बाहेर असलेल्या रमेश रेड्डी यांना काही अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. कोणतीही वादावादी न करता थेट जवळून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सलग गोळ्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. काही क्षणांतच रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वर्दळीच्या भागात अशा प्रकारे खुलेआम गोळीबार होणे ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे. या हत्येमागील कारणांचा शोध घेत असताना तपासाला धक्कादायक पार्श्वभूमी मिळाली आहे.

रमेश रेड्डी यांचे भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांची १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अवघ्या एका वर्षाच्या आत रेड्डी कुटुंबातील दुसरी हत्या झाल्याने या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा पैलू पुढे आला आहे. मागील काळात रमेश रेड्डी यांचा जुगाराशी संबंधित व्यवसाय असल्याची माहिती मिळत असून अलीकडे त्यांनी तो व्यवसाय बंद केला होता असे समजते. त्यामुळे भूतकाळातील व्यवहार, जुने संबंध किंवा संभाव्य वैर या हत्येच्या कारणांमध्ये गुंतलेले आहेत का याचाही तपास सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणात जुना वाद, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक वैर किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष या सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांचे अलीकडील व्यवहार आणि हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. दरम्यान घटनास्थळाजवळील CCTV कॅमेऱ्यांमध्ये काही संशयित हालचाली कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकीवरून आलेल्या संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावरून आरोपींची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेची पथकेही तपासात सहभागी झाली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने रेड्डी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका भावाच्या हत्येचे दुःख अजून ओसरले नसतानाच दुसऱ्या भावालाही अशाच प्रकारे गमावण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group