बारामती : महान्यूज लाईव्ह
शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यापारासंदर्भातील अडचणी, समस्या व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व्यापारी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
यानुसार शनिवार, दिनांक 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत राजस्थान वस्त्रदालन, श्री महावीर पथ, बारामती येथे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत व्यापाऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्याची तसेच त्यावर चर्चा करून मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
बारामती शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या बैठकीची नोंद घेऊन आपल्या व्यापारासंदर्भातील अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.











