• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांदा आणि कपाशीचे आलेले पैसे नेले.. दौंडच्या सोनवडीत दोन बंगल्यात दरोडा! लाखोंचा सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास!

tdadmin by tdadmin
November 1, 2025
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
कांदा आणि कपाशीचे आलेले पैसे नेले.. दौंडच्या सोनवडीत दोन बंगल्यात दरोडा! लाखोंचा सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : अहिल्यानगर ते मनमाड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आणि दौंड शहरालगत असलेल्या सोनवडी गावच्या लोखंडे वस्ती येथे शनिवारी पहाटे दोन बंगल्यात चोरट्यांनी दरोडा टाकून बंगल्यातील मौल्यवान सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या दत्तात्रेय सपकाळ यांच्या बंगल्यात दरोडा पडला. ओढ्याजवळ असलेल्या बंगल्याच्या बाजूचे लाकडी दार उचकटून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. खोलीमधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर व लॉकरचे कुलूप तोडण्यात आले.

कपाटातील अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक लाख रूपयांची रोकड चोरून नेली. तसेच शेतकरी असलेल्या सपकाळ यांची कांद्याची व कपाशीची पट्टी असलेली रोकडच चोरीला गेली आहे. बंगल्याच्या मागील बाजूच्या संरक्षक जाळ्याच्या लोखंडी तारा तोडून दरोडेखोरांनी गोदामात देखील उचका पाचक केली आहे.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पाच तरूण बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारताना दिसून येत आहेत. तोंडावर माकड टोप्या, हातात टॉर्च, अंगात जर्किन, काळ्या रंगाच्या पॅण्ट व शर्ट, असा त्यांचा पेहराव दिसून येत आहे. त्यांनी या वस्तीत असलेल्या सर्व बंगल्यांची आणि घरांची टेहळणी केल्याचे चित्रित झाले आहे.

तसेच लोखंडे वस्ती येथील शिक्षक हिरालाल शिंदे यांच्या दौंड नगरपालिका हद्दीतील बंद बंगल्यावर पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. लोखंडी सुरक्षा दाराची त्रिस्तरीय रचना असलेले कुलूप तोडून व त्यानंतरचे लाकडी दार उचकटून दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. हॉल व आतील खोल्या मधील सर्व कपाटे, शोकेस, दिवाण मधील सर्व साहित्य दरोडेखोरांनी उचकले.

या बंगल्यातील सर्व चीजवस्तू दरोडेखोरांनी लंपास केल्या असून त्याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही घटना शनिवारी ( दि १) मध्यरात्री २ ते ४ दरम्यान घडली. दरम्यान दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Next Post
बीड क्राईम स्टोरी : हेळंब गावात दहशतीचा थरार, मुलीला विष पाजले, तीन मुलांना बेदम मारलं!

पाटसच्या यात्रेवर सामूहिक गुन्हेगारीचे सावट! नागरिकांमध्ये चिंता! पोलीसांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group