राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह.
दौंड : नगर सातारा महामार्गावर असलेल्या दौंड तालुक्यातील जिरेगाव हद्दीत बेकायदा मुरूम उत्खनाने अक्षरशः कहर केला आहे. पोकलेन, जेसीबी मशीनच्या साह्याने सुरू असलेल्या या उत्खनन करणाऱ्यांनी चक्क महामार्गच पोखरला आहे. तर बारामती तालुक्यात जाणारी मुख्य विद्युत वाहकतारांचा खांबाला धोका निर्माण झाला आहे. हा खांब पडल्यास बारामती आणि दौंड तालुक्यातील अनेक गावे अंधारात राहतीलच पण जीवित आणि विविध आम्ही मोठ्या प्रमाणात किती निर्माण झाली आहे.
दौंडचा महसूल विभाग आणि महावितरण विभाग जबाबदार असणार आहे. दौंड तालुक्यातील जिरेगाव हद्दीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी शेतकऱ्यांच्या शेतात मागील अनेक दिवसांपासून जेसीबी पोकलेन मशीन ने उत्खनन करून दहा ते पंधरा हायवा वाहनांच्या सहाय्याने दिवस रात्र वाहतूक सुरू आहे.
कुरकुंभ मधील भगत नावाच्या व्यक्तीने राजकीय वरदहस्ताने आणि महसूल विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम गौण खनिज कायद्याच्या नियमांचे उलघंन करून मुरूम उत्खनांचा सपाटा लावला आहे. खासगी शेतजमीन मालकाला हाताशी सर्रासपणे रोज लाखो रुपयांची मुरूम चोरी सुरू ठेवली आहे. जेसीबी आणि पापलेट मशीनच्या सहाय्याने उत्खनन सुरू असल्यामुळे नगर सातारा या महामार्ग हद्दीतील ३० ते ४० रस्ता ही पोखरला आहे.
तसेच रस्त्यालगत दौंडमधून बारामती तालुक्यात गेलेला मुख्य विद्युत वाहिनीचा विद्युत खांबही चारी बाजूने उकरला आहे. परिणामी विद्युत वाहकतारा खाली आल्या असून वाऱ्या आणि पावसामुळे हा खांब केंव्हाही पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा विद्युत खांब पडल्यास दौंड तालुक्यातील बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत प्रवाह बंद पडुन जीवित तसेच वित्तहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेतली असून तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी, महावितरणचे कर्मचारी आमच्या खिशात आहेत. तसेच आम्ही तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमचे कोणच काही करू शकत नाही. असे भगत नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सांगत आहे.
दरम्यान महसूल विभागाने गौण खनिज कायद्याच्या अंतर्गत नियम व अटींच्या अधीन राहुन संबंधित व्यक्तींना परवानगी दिल्याचे सांगितले जाते. मात्र परवानगी दिली किती ब्रासची आणि उत्खनन केले किती ब्रासची याची पाहणीही स्थानिक महसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली नाही. गौण खनिज कायद्याच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी. संबंधित व्यक्तींवर महावितरण व महसूल विभागांना गुन्हा दाखल करून कारवाई करावी. दरम्यान,कुरकुंभ येथील याच भगत नावाच्या माफियावर तत्कालीन तहसीलदार संजय पाटील यांनी मळद तलावातील बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून त्यांच्या मालमत्तेवर शासकीय बोजा चढावुन मोठी कायदेशीर कारवाई केली होती.
तसेच दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीही वाळू उपसा प्रकरणी वाहनांवर कारवाई केली होती. कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत बेकायदा मुरूम उत्खन करणाऱ्या या व्यक्तीवर तहसीलदार आणि महावितरण गुन्हा कारवाई करणार का ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.











