• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडच्या पंचायत समितीला कोणी वालीच नाही ? अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या! नागरिकांची होतेय गैरसोय !

tdadmin by tdadmin
June 4, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंडच्या पंचायत समितीला कोणी वालीच नाही ? अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या! नागरिकांची होतेय गैरसोय !

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यामुळे सध्या दौंड पंचायत समितीला कोणी वालीच राहिला नाही अशी परिस्थिती आहे. कामानिमित्त पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांना विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आणि टेबल रिकाम्याच दिसत आहेत.

त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय वारंवार टेबलावर साहेब येतात का? हे पाहण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे दौंड पंचायत समितीच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची बदली काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना तात्पुरता पदभार दिला आहे. त्यामुळे ते शिरूर आणि नंतर दौंडचा कामकाज बघत आहेत.

त्यामुळे तालुक्यातील कामानिमित्त येणाऱ्या अनेक नागरिकांना गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची बदली झाली, याची कल्पना नाही आणि त्यातच प्रभारी गटविकास अधिकारी हे कधी तरी येतात. परिणामी वरिष्ठ अधिकारी नसल्याने पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कार्यालयामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मजा झाली आहे. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र पंचायत समितीत पाहायला मिळत आहे.

मंगळवारी (दि ३) हे चित्र कामानिमित्त पंचायत समितीत आलेल्या अनेक नागरिकांना पाहायला मिळाले. पंचायत समितीचा समाज कल्याण विभाग सोडला तर इतर विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्ची आणि टेबल रिकामा असल्याचे चित्र दिसून आले. तिथे उपस्थित असलेला एका कर्मचाऱ्याला विचारले असता, ते कुठे गेल्यात, आम्हाला माहिती नाही, कधी येणार हे सांगता येत नाही. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे ते नाहीत असे उत्तर ऐकायला मिळाले.

त्यामुळे अनेक नागरिकांना सध्या पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारावे लागत असून कामे वेळेत होत नसल्याने गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दौंड पंचायत समितीचे आस्थापन विभागाचे अधिकारी यांच्याकडे मंगळवारी ( दि ३) किती अधिकारी हजर आहेत आणि किती रजेवर आहेत ? याबाबत माहिती घेण्यासाठी गेलो असता, तेही त्यांच्या टेबलवर उपस्थित नव्हते. तर प्रभारी गटविकास अधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ अधिकारीच उपस्थित नसल्याने तक्रार नेमकी कोणाकडे करावा असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

Next Post
बारामतीतल्या नियोजित प्रभाग रचनेविरोधात सर्वपक्षीय बैठक! जनआंदोलन उभारण्याची तयारी!

बारामतीतल्या नियोजित प्रभाग रचनेविरोधात सर्वपक्षीय बैठक! जनआंदोलन उभारण्याची तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group