• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

511 शेतकरी कंपन्या स्थापनेसाठी पुढाकार.. हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार.. 365 धार्मिक संस्थांचे मोफत ऑडिट! कोण आहेत शंकर अंदानी?

tdadmin by tdadmin
April 5, 2025
in सामाजिक, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
511 शेतकरी कंपन्या स्थापनेसाठी पुढाकार.. हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार.. 365 धार्मिक संस्थांचे मोफत ऑडिट! कोण आहेत शंकर अंदानी?

घनश्याम केळकर, बारामती

चार्टर्ट अकाऊंटट किंवा सीए या पदवीला देशात मोठी किंमत आहे. ही पदवी मिळाल्यानंतर अक्षरश: पैशात खेळता येते. पण याऐवजी या पदवीचा उपयोग समाजकार्यासाठी करणारे सीए शंकर अंदानी हे यावेळच्या भीमपुत्र आयडॉलचे मानकरी आहेत.

आपले मूळ घर आणि गाव नेसत्या कपड्यानिशी सोडायला लागणे यासारखे दुर्देव ते कोणते? पण देशाच्या फाळणीच्या वेळी लाखो सिंधी हिंदूंना आपले सिंध प्रांतातील घर, दार, मालमत्ता आहे तशी सोडून भारतात यावे लागले. हे लोक देशात जागोजागी पसरले. पण त्यातील बहुतेकांनी आपल्या कष्ट आणि हिंमतीच्या जोरावर पुन्हा या देशात आपले स्थान निर्माण केले.

शंकर अंदानींचे कुटुंबही अशाचपैकी एक होते. हे कुटुंब आजच्या अहिल्यानगरमध्ये स्थायिक झाले. शंकर अंदानींनीही त्यांच्या लहानपणी गरीबीचे चटके सोसले. यातून शिक्षण घेऊन सीए झाल्यावर त्यांनी या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला.

आज ते ३६५ धार्मिक संस्थांचे मोफत ऑडिट करतात. यामध्ये मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा सामिल आहे. ५११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे, ज्यामध्ये ५ लाखाहून जास्त शेतकरी सभासद आहेत. अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी अनाथालय, गोशाळा यासारखे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सुरु ठेवले आहेत. हजाराहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी पोलिसांना मदत केली आहे. याखेरीज शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.

त्यांच्या व्यवसायात त्यांचे नाव आहे. अहिल्यानगरची महानगरपालिका, शिर्डी देवस्थानसारख्या अनेक नामंवत संस्थांचे ते सीए आहेत. राज्यातील एनजीओंना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आता एका राज्यस्तरीय संस्थेची स्थापना केलेली आहे. याव्दारे ते सीएसआर फंड मिळविण्यासाठी या एनजीओंना मदत करतात. या कामासाठी त्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. त्यांना आजपर्यंत शेकडोंनी पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले आहे.

असे हे शंकर अंदानी भीमपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहे. हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Next Post
सुरूर ते वाई रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने! ठेकेदाराच्या गलथानपणावर नागरिक संतप्त!

सुरूर ते वाई रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने! ठेकेदाराच्या गलथानपणावर नागरिक संतप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group