कधी कारमध्ये काचा बंद राहिल्याने गुदमरून मुलांचा मृत्यू होतो. अशा घटना अनेक वेळा आपण ऐकल्या आहेत. आता उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील ही दुर्घटना! तसं पाहिलं तर वेगळ्या राज्यातील असली, तरी सुद्धा ती तुमच्या, आमच्या सगळ्यांशी निगडित आहे. अत्यंत दुर्दैवी घटनेत दीड वर्षाच्या चिमुकलेला आपला प्राण गमवावा लागला आहे.
नवीन गाडी घेतली म्हणून रोशन ठाकूर यांचे कुटुंब पूजा करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या बलिहा जिल्ह्यातील चंदाडिह येथील प्रसिद्ध मंदिरामध्ये कुटुंब गेले. मात्र तेथे गेल्यानंतर माकड पाहण्यासाठी बाहेर डोकावलेल्या चिमुकल्याची मान पॉवर विंडोमध्ये अडकली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रोशन ठाकूर यांचा भाचा रियांश हा कुटुंबीयांसमवेत नवीन गाडीत बसून मंदिरात दर्शनासाठी आला होता. कार उभी केल्यानंतर कारच्या काचा लावत असताना अचानक रियांश ला माकड दिसले. ते माकड पाहण्यासाठी त्याने बाहेर डोकावले आणि तेवढ्यात पॉवर विंडोची काच वर पोहोचली आणि त्यात रियांशची मान अडकली.
यात तो बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात तर नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पॉवर विंड चे बटन चालकाने टाकले असावे आणि मुलगा पाठीमागे असावा. ज्याने अचानक बाहेर पाहिले. तो मुलगा अचानक बाहेर पाहील असे कोणाच्याच लक्षात आले नसावे. त्यावरून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.











