दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात आज 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरातील कोवीड सेंटरच्या आज आलेल्या अहवालात 20 पैकी 6 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 14 जण निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये शुक्रवारी ( दि. 18 ) 20 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 32 ते 45 वयोगटातील 6 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड शहारात 3 , गोपाळवाडी 1 व ग्रामीण भागात 2 असे एकूण 6 रूग्ण आढळले आहे. ही माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, संग्राम डांगे यांनी दिली.
यवत कोवीड सेंटर मध्ये काल शनिवारी ( दि 19 ) 110 जणांची तपासणी केली, यापैकी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यामध्ये 11 ते 61 वयोगटातील 11 पुरुष व 7 महिला यांचा समावेश आहे. केडगाव 12, पारगाव 2, तर यवत, कासुर्डी, खामगाव, पिंपळगाव या गावात प्रत्येकी एक असे एकूण 18 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली.










