• Contact us
  • About us
Monday, July 27, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल..! ७ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

tdadmin by tdadmin
October 6, 2023
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आर्थिक, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
– विनाताबा साठेखत करून घेतलेल्या जमिनी व्यतिरिक्त अधिकच्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केल्यावर शेत जमिनीच्या मालकाने याबाबत विचारणा केली असता त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) व आमदार दत्तात्रय भरणे यांचे खास समर्थक असलेले, इंदापूर तालुक्यातील वजनदार नेते दीपक जाधव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान यासंदर्भात बारामतीच्या सत्र न्यायालयाने दिपक जाधव यांना अंतरिम जामीन मंजूर केला असून ७ ऑक्टोबरपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी याची सुनावणी आहे.


याबाबत सुभाष अर्जुन मिसाळ यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दिपक बाळासाहेब जाधव, दिनेश बाळासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव (सर्व रा. गलांडवाडी,ता- इंदापूर, जि.पुणे) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष अर्जुन मिसाळ यांच्या फिर्यादीवरून मिसाळ यांची यांची बेडशिंगे येथील गट नं- २३ मध्ये २ हेक्टर ८९ आर क्षेत्रापैकी ६० आर क्षेत्र हे दिनेश बाळासाहेब जाधव यांना दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर येथे विनाताबा साठेखत करून दिले होते. मात्र सुभाष मिसाळ यांना अचानक गाव कामगार तलाठी यांचा फोन आला व तात्काळ तुमच्या शेतातील गट नं-२२ मध्ये खोदकाम झाले आहे त्याचा पंचनामा करायचा आहे म्हणून तुम्ही शेतामध्ये यावे अशी माहिती दिली.

त्यानुसार मिसाळ हे बेडशिंग येथील शेतामध्ये आले असता साठेखत करून दिलेल्या क्षेत्रापैकी अधिकच्या क्षेत्रात मोठमोठे खड्डे खोदून त्यातील दगड, माती गायब असल्याचे दिसले. त्या नंतर गाव कामगार तलाठी, नायब तहसीलदार यांनी केलेल्या पंचनामा नुसार दिलेल्या माहितीवरून त्यांना असे समजले की ६० आर क्षेत्र व्यतिरिक्त अधिकच्या ६५ आर क्षेत्रामध्ये आपल्या संमतीशिवाय अतिक्रमण करून खोदकाम झाले असून त्यामधील ३७,५०० ब्रास खोदकाम झाले आहे. झालेल्या खोदकामाची एकूण रॉयल्टी २ कोटी रुपये मिसाळ यांना भरावी लागणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानंतर सुभाष मिसाळ हे दिनेश जाधव यांना विचारणा करण्यासाठी गलांडवाडी नं.१ येथील घरी गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब जाधव यांनी कोणालातरी फोन केला. त्यानंतर त्या ठिकाणी दीपक बाळासाहेब जाधव व दिनेश बाळासाहेब जाधव आले. त्यापैकी एकाने 13 ते 14 लाख रुपये आपण दिले असून ही जमीन आपल्या मालकीची झाली आहे, असे सांगितले.

अद्याप आम्ही तुमच्या नावावर खरेदी खत करून दिलेले नाही. व आम्ही दिलेल्या ६० आर क्षेत्रापैकी ६५ आर क्षेत्रात अतिक्रमण करून फसवणूक केली व त्या ठिकाणी खोदकाम केली, असे म्हणताच उपस्थित असलेल्या आरोपींनी फिर्यादी सुभाष अर्जुन मिसाळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने दीपक बाळासाहेब जाधव ,दिनेश बाळासाहेब जाधव व बाळासाहेब जाधव यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे दीपक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Next Post
शेतकरी प्रामाणिकच असतो बरं..! बुलढाण्याच्या बॅंकेच्या खात्यात अचानक आले १५ लाख..! शेतकरी दचकला..जुमला खरा झाला काय? अशी शंका आली, पण माहिती घेतली आणि बॅंकेला केले परत..!

शेतकरी प्रामाणिकच असतो बरं..! बुलढाण्याच्या बॅंकेच्या खात्यात अचानक आले १५ लाख..! शेतकरी दचकला..जुमला खरा झाला काय? अशी शंका आली, पण माहिती घेतली आणि बॅंकेला केले परत..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group