दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील ६० वर्षांची ज्येष्ठ महिला वृध्दापकाळाने आजारी असल्याने तिचा पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र या महिलेचा नातेवाईकांचा अद्याप शोध लागला नाही. अशी माहिती पाटस पोलीसांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सत्यभामा घाडगे (वय ६० रा. पाटस ता. दौंड जि.पुणे ) ही महिला अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील ससुन रुग्णालयात १३ ऑगस्ट २०२३ रोजी उपचारासाठी गेली होती मात्र १६ ऑगस्ट २०२३ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने ससुन रुग्णालयात तिचा अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यभामा घाडगे ही महिला पाटस येथे राहत असून तिच्या नातेवाईकांनी किंवा तिला ओळखत असलेल्यांनी त्वरित पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संजय देवकाते मो. 9923695728 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पाटस पोलीसांनी केले आहे.











