दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत कोवीड सेंटर मध्ये काल (ता.१२ ) १४४ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी २२ जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह तर १२२ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
यामध्ये १० ते ६३ वयोगटातील १३ पुरूष व ९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये राहू व जावजीबुवाची वाडी दोन, यवत, केडगाव, सहजपूर, वरवंड, वाळकी या गावात प्रत्येकी दोन तर कासुर्डी, बोरीऐंदी, उंडवडी, खुटबाव, देऊळगाव गाडा, नांदुर प्रत्येकी एक असे एकूण २२ जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. यवत उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली.










