इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज देखील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा आकडा कायम राहिला. आज दिवसभरात इंदापुर मध्ये 68 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1083 वर पोहोचली आहे.
एकूणच बारामती पाठोपाठच इंदापूरचाही क्रमांक वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा असल्याकारणाने बारामती प्रमाणे इंदापुर मध्ये देखील शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू राबवला जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून तालुक्यात बऱ्यापैकी गावांमध्ये पोलीस ठाण्यांमार्फत जनता कर्फ्यू सुरू आहे, त्यामुळे बारामती प्रमाणे सार्वत्रिक जनता कर्फ्यू इंदापूर मध्ये लागू होण्याची चिन्हे कमी आहेत.
इंदापूर तालुक्यातील आज कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण निमगाव केतकी येथील असून यामध्ये 65 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी, 33 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
वालचंदनगर येथील 27 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला व 27 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. अकोले येथील 32 वर्षीय पुरुष, पडस्थळ येथील 36 वर्षे पुरुष, अंथुर्णे येथील चाळीस वर्षे पुरुष, 47 वर्षीय पुरुष, आठ वर्षीय मुलगी, 28 वर्षे पुरुष व 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
उदमाईवाडी येथील 74 वर्षे पुरुष, बेलवाडी येथील 68 वर्षे पुरुष, तीस वर्षे पुरुष, 70 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
इंदापूर येथील श्रीराम सोसायटीमधील 14 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, इंदापूर मधील कमला नेहरू सोसायटीमधील 56 वर्षे पुरुष व 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील तापी येथील 27 वर्षे पुरुष, 29 वर्षे पुरुष, 32 वर्षे पुरुष व 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. शेळगाव येथील 32 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. हगारेवाडी येथील 55 वर्षीय महिला, जंक्शन येथील 48 वर्षे पुरुष, 42 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अंबिका नगर इंदापूर येथील 65 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, अकरा वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगा, 13 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. आजोती येथील 80 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक व 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जामदार गल्ली येथील 62 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. लाखेवाडी येथील तीस वर्षे पुरुष, 45 वर्षे पुरुष, रुई येथील 26 वर्षीय महिला, निरवांगी येथील 40 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे. काटी येथील 57 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तिघांचा कोरोना ने घेतला बळी
इंदापूर तालुक्यासाठी आजचा दिवस दुर्देवी गेला. आज निरवांगी येथील 65 वर्षीय पुरुष, अंबिकानगर येथील 78 वर्षीय पुरुष व भाटनिमगाव येथील 65 वर्षीय महिला रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे आज कोरोना च्या बळींची संख्या 43 वर पोहोचली.










