इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात बारामती व इंदापूर कोवाड सेंटरमध्ये घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचा जणू विक्रम झाला आज दिवसभरात तब्बल 28 जणांना कोरोनाची बाधा झाली. संध्याकाळच्या अहवालामध्ये इंदापूर शहरातील 17 व भिगवण येथील 2 अशा 19 जणांची नव्याने भर पडली.
इंदापूर तालुक्यातील अकोले व निंबोडी येथील परंतु बारामतीत तपासणी केलेल्या रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सकाळी हे 2 रुग्ण आढळल्यानंतर इंदापूर येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी केलेल्या 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुपारी बारामतीतील प्रलंबित राहिलेले अहवाल आल्यानंतर काझड व भिगवण येथे प्रत्येकी 1 जणाला कोरोनाची बाधा आढळून आली. अशाप्रकारे दुपारपर्यंत 9 रुग्ण कोरोनाचे आढळून आले होते.
आता संध्याकाळी हाती आलेल्या माहितीनुसार इंदापूर शहरात जुन्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील तब्बल 17 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर भिगवण येथे नव्याने 2 जणांना कोरोना आढळून आला.
मानकरवाडी नोंद झालेली रुग्ण बारामती ची
आज दुपारी बारामतीतील शासकीय अहवालात महिला रुग्णाचे नाव नोंदणी करताना मानकरवाडी तालुका इंदापूर चा उल्लेख झालेला होता. त्यानुसार आलेला अहवाल हा मानकरवाडी नावाने आला, परंतु सदरची महिला ही बारामती शहरातील असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे मानकर वाडीत आज कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळून आला नव्हता हे माहिती झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.











