बारामती : महान्यूज लाईव्ह
काल घेतलेल्या सर्व नमुन्यांचे अहवाल आले असून बारामती तालुक्यातील जैनकवाडीतील ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आज दिवसभरातील रुग्णसंख्या चारवर पोहोचली आहे.
बारामतीत काल ६९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर दुपारी पुण्यात तपासणी केलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सायंकाळी एक अहवाल प्रतिक्षेत होता. तोही आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये जैनकवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.











