इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापुरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अनोख्या पद्धतीने कोरोनाबद्दल जनजागृती केली. इंदापूर शहरानजीकच्या इंगोले मैदानात भरलेल्या मंडईत जाऊन त्यांनी विक्रेत्यांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले. यावरच न थांबता त्यांनी ग्राहकांशी कशा पद्धतीने व्यवहार करायचा याबद्दलही मार्गदर्शन केले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर शहरातील एका सावडण्याच्या विधीसाठी जात होते. त्यावेळी त्यांना इंदापूर शहरानजीकच्या इंगोले मैदानावर मंडई भरल्याचे आढळले. त्यांनी आपला मोर्चा या मंडईकडे वळवला. त्या ठिकाणी स्वत: प्रत्येक विक्रेत्याकडे जाऊन त्यांनी कोरोनाबद्दल मार्गदर्शन केले. ग्राहकांना भाजी देताना आणि पैसे घेताना दोघांनीही सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावं आणि गर्दी टाळावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
इंदापूरमध्ये मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असतानाच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.











Keep posting…