महान्यूज लाईव्ह टीम
१२००० पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांच्या परदेशातून मिळणाऱ्या निधीसाठीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही, असे केंद्रीय गृहखात्याच्या सूत्रांनी सांगितले.
मदर तेरेसा मिशनरी संस्थेच्या परवाना नूतनीकरणाला काही दिवसांपूर्वीच केंद्रसरकारने नकार दिला आहे.
मात्र ६००० पेक्षा स्वयंसेवी संस्थांनी अशा नूतनीकरणासाठी अर्जच केला नसल्याने त्यांचे परवाने रद्द झाल्याचे केंद्रीय गृहखात्याचे म्हणणे आहे. या संस्थांना नूतनीकरणासाठी रिमांईंडरही पाठविण्यात आले होते, असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.
या संस्थांमध्ये ऑक्सफेम इंडिया ट्रस्ट, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, लेप्रसी मिशन इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर यासारख्या संस्थांचा समावेश आहे.
आता केवळ १६८२९ स्वयंसेवी संस्थांकडेच परदेशातून मदत मिळवण्याचा परवाना आहे. या संस्थांच वर्षाअखेरीस आपल्या परवान्याचे नूतनीकरण करून घेऊ शकल्या आहेत.











