सारंगखेडा : महान्यूज लाईव्ह
सारंगखेडा येथील अश्व प्रदर्शनाची दरवर्षीच मोठी चर्चा असते. यावर्षीदेखील येथील अनेक घोडे आणि त्यांच्या किंमती या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यामध्ये नाशिकहू आलेला ‘ रावण ‘ हा घोडा सगळ्यात भाव खाऊन जातो आहे. या घोड्याला ५ कोटीची मागणी येऊनही घोड्याचा मालक घोडा विकण्यास तयार नाहीये.
हा घोडा माझा मालक आहे, मी त्याचा नोकर आहे. नोकर मालकाची किंमत कशी ठरवू शकेल, या शब्दात असद सय्यद यांनी या घोड्याची विक्री करण्यास नकार दिला आहे. सगळ्या महाराष्ट्रात या घोड्याच्या उंचीचा दुसरा घोडा नाही. मला या घोड्यासाठी ५ कोटीपर्यंत किंमत द्यायला लोक तयार आहेत. परंतू हा घोडा मी विकणार नाही असे सय्यद यांनी सांगितले.
संपुर्ण काळ्या रंगाच्या या घोड्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचा ठिपका आहे. ६७ इंच इतकी या घोड्याची उंची आहे.
सारंरखेड्याच्या या बाजारात देशभरातून घोडे विक्रीसाठी येत असतात. यावर्षीदेखील हे अश्वप्रदर्शन भरलेले आहे. याठिकाणी कोट्यावधी रुपये किंमतीचे अनेक घोडे या बाजारात आलेले आहेत.











