बीड : महान्यूज लाईव्ह
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी बीडमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आक्रमक झाली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं आहे.
अर्धा तास झालेल्या या आंदोलना दरम्यान औरंगाबाद आणि लातूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं, यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी देखील यावेळी सुभाष राऊत – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष यांनी केली .











