• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चला रायगड प्रदक्षिणेला ! २६ डिसेंबरला !

Maha News Live by Maha News Live
December 19, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, कोकण, क्रीडा, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, Featured
0

महाड : महान्यूज लाईव्ह

रायगड किल्ला म्हटला की डोळ्यासमोर येतो तो शिवरायांचा अतुलनीय पराक्रम, सह्याद्रीचा रांगडेपणा आणि दऱ्याखोऱ्या मध्ये घनदाट जंगलात लपलेली वनसंपदा. महाराष्ट्राची अस्मिता असणा-या अशा या रायगडाला प्रदक्षिणा म्हणजे साक्षात मंदिरालाच प्रदक्षिण. या किल्ल्याला अशी प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांना मनात दडलेली असते.अशा या साहस वीरांसाठी आणि रायगड प्रेमींसाठी रायगड प्रदक्षिणेची संधी चालून आली आहे . यावर्षी महाड युथ क्लब व रायगड जिल्हा परिषदेच्या सहकार्याने 26 डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा आयोजित केली आहे. तर चला या प्रदक्षिणेला.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर अनेकजण जात असतात. परंतु रायगडाचा खरा इतिहास आणि परिसर समजून घ्यायचा असेल तर रायगड प्रदक्षिणा प्रत्येकाने करायलाच हवी. रायगड किल्ल्याच्या 15 किलोमीटरचा परिसर व चार तासाच्या दमछाक होणा-या खडतर प्रवासात ही प्रदक्षिणा पूर्ण होते. साहस वीरांना आव्हान देणारी आणि आपल्या शारीरिक शक्तीचे मूल्यांकन करणारी अशीही प्रदक्षिणा असते. प्रदक्षिणेच्या वाटेवर पक्षांची मंजुळ गुंजारव. सरपटणाऱ्या प्राण्यांची घाबरवणारी चाहूल, हिरव्यागार वनस्पतींचा स्पर्श, शुद्ध हवा, व वृक्षांची थंडगार सावली तर कधी अंगातून वाहणार्‍या घामाच्या धारा, चिंचोळ्या पाऊल वाटेवरील उंच चढण तर कधी तीव्र उतारावर सरकत जाणारे पाय असे विविध पडाव या प्रदक्षिणेत पार करावे लागतात. अनुभवांची मोठी शिदोरी या प्रदक्षिणमध्ये जमा होत असते.रायगड युथ क्लब तीस वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. दरवर्षी आठशे ते हजार प्रदक्षिणार्थी यामध्ये सहभागी होतात.


कशी असेल प्रदक्षिणा


रायगड प्रदक्षिणेला 26 डिसेंबरला सकाळी 6 वाजता पायथ्यापासून सुरूवात होणार आहे. या प्रदक्षिणेत 10 वर्षावरील कोणतीही सुदृढ व्यक्ती सहभागी होऊ शकते. 15 किलोमीटरची ही प्रदक्षिणा पूर्ण करायला प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे किमान 4 तासाचा अवधी लागतो. प्रदक्षिणा पूर्ण करणा-यांना युथ क्लबतर्फे प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. सहभागी होणा-यांना मुक्कामाची सोय विनामुल्य केली जाते. तसेच प्रदक्षिणेच्या दिवशी चहा नाश्ता, पॅक फुड व जेवण आयोजकांमार्फत दिले जाते.



प्रदक्षिणेला येताना काय करावे

प्रदक्षिणेत सहभागी होणा-यांनी आपल्या सोबत पाण्याची बाटली, लंच बॉक्स, टोपी, सुती कपडे, अंथरूण व पांघरूण, लागणारी औषधे सोबत आणावीत.

कसे पोहोचाल


रायगडला जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथून 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मुंबई पुणे येथून थेट बससेवा आहेत. तसेच कोकण रेल्वेमार्गावर वीर किंवा माणगाव स्थानकावर उतरून रायगडला जाता येते.


आपल्यालाही रायगडची प्रदक्षिणा करायची असेल तर नाव नोंदणीसाठी दिलिप धारप, संतोष सकपाळ 9422689180, राजेश बुटाला 8805848396 येथे संपर्क साधावा. आपण यासाठी http://www.youthclubmshad.org
येथे ऑनलाईन बुकिंग करू शकता

Next Post

कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्थ बारामतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group