आळंदी : महान्यूज लाईव्ह
गोपीनाथजी मुंढे यांची जयंती येथील ह.भ.प पंडित महाराज नागरगोजे ट्रस्ट ज्ञानज्योत धर्मशाळा आळंदी येथे सामाजिक बांधिलकीतून साजरी करण्यात आली.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. यांच्या अध्यक्षस्थानी विलास सांगळे होते.
या प्रसंगी डॉ. नारायण जायभाय, प्राचार्य हभप पांडुरंग महाराज मिसाळ, ॲड. संदीप जायभाय, ॲड.एम.एस.नाडे, समर्थ केकान, धीरज घोळवे, निलेश सानप, माऊली काळे, सचिन कांदे, भिकाजी घुले, सुमंत सानप, वैभव घुगे, गजानन नागरे आदि उपस्थित होते.
गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त १९ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी विलास सांगळे यांनी केले. डॉ. नारायण जायभाय, प्राचार्य हभप पांडुरंग महाराज मिसाळ यांनी मान्यवरांच्या जीवन कार्याचा परिचय करून देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी नितिन नवनाथ सांगळे, भाजपा कायदा आघाडी पुणे जिल्हा सहसचिव ॲड.एस.एस.आघाव, आदित्य सांगळे, वंजारी सेवा संघ आळंदी शहर अध्यक्ष महादेव मिसाळ, माऊली थोरवे, बाळासाहेब पालवे, विशाल सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड.एस.एस.आघाव यांनी केले.