मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारत आणि न्युझिलंडमध्ये सध्या क्रिकेट खेळले जात आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या अपयशानंतर न्युझिलंडविरोधात भारताने ३ टी – २० सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. आता २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. हा सामना गुरुवारी होणार आहे.
यापुर्वी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंगात रंगविण्याच्या सध्याच्या भारतातील वातावरणात आता हा वाद पुढील काही दिवसात खुप मोठे स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय भारतीय खेडाळूंना मासांहार करण्याची सक्ती करीत आहे. आणि हे मांससुद्धा ” हलाल ” असले पाहिजे अशी सक्ती केली जात आहे, अशी माहिती सोशल मिडियावरून पसरवली जात आहे. बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. परंतू सोशल मिडियावर यावरून मोठा गदारोळ माजविला जात आहे. या सगळ्या प्रकाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असून यामध्ये सोशल मिडियाचा विशिष्ठ भाग हिरीरीने उतरला आहे.
उपलब्ध माहितीनूसार बीसीसीआयने खेडाळूंच्या तयारीसाठी त्यांच्या आहारात मांसाहार सक्तीचा केला आहे. खेळाडूंना नविन आहाराची सक्ती केली गेली आहे. यामध्ये हलाल असलेलाच मांसाहार करावा अशी बीसीसीआयने सक्ती केल्याचा शोध सोशल मिडियाने लावला असून त्यावरुन बीसीसीआयला हिंदूविरोधी ठरविले जात आहे.
” हलाल ” ही मुस्लिम संज्ञा आहे. मुस्लिमांमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस खावे, खाण्यासाठी प्राण्याला कशा प्रकारे मारावे याचे काही नियम आहेत. या नियमात बसणाऱ्या प्राण्याचेच मांस ” हलाल ” म्हणजे खाण्यास योग्य समजले जाते.
या प्रकरणात बीसीसीआयने हलालची सक्ती केली की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र स्वयंघोषित हिंदू हितरक्षक मात्र चवताळून उठले आहेत.











