जोशाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सोनगीर ( जि. धुळे ) या ठिकाणी एन जी बागुल हायस्कूल येथे दरवर्षोप्रमाणे या वर्षी सुद्धा दिव्यांग बांधवांना दिपवाली सण साजरा करता यावा यासाठी पन्नास कुटुंबियांना किराणा किट(20 वस्तु) वाटप करण्यात आले.
तसेच दिव्यांग भगिनींना भाऊबीज निमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप भाऊ माळी (दलित मित्र /रुण मित्र) यांच्या वतीने साडी व खण वाटप करण्यात आले.