• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थोरात – कुलांच्या कलगीतुऱ्यात उतरले ‘भीमा पाटस’च्या संस्थापकांचे वारसदार! आमदार राहुल कुल यांना दिला इशारावजा सल्ला..!

Maha News Live by Maha News Live
August 28, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

भिमा पाटसची चौकशी ही कारखाना स्थापनेपासून करावी ही मागणी बेजबाबदारपणाची, आमदार राहुल कुल यांनी विचार करून बोलावे, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे आणि माजी संचालक योगेंद्र शितोळे यांचा इशारा.

राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह

दौंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ईडीमार्फत किंवा सहकार आयुक्तामार्फत चौकशी करावी, मात्र ती कारखान्याची स्थापना झाल्यापासून ते आतापर्यंतच्या कारभाराची करावी असे विधान भीमा पाटसचे अध्यक्ष आणि विद्ममान आमदार राहुल कुल यांनी केले होते. आमदार कुल यांच्या या विधानावर आता ऊस उत्पादक सभासदांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भीमा पाटस सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी कै. मधुकर (काका) शितोळे यांचे चिरंजीव आणि भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे आणि पुतणे व माजी संचालक योगेंद्र शितोळे यांनी कुल यांच्या या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागील वीस वर्षे कारखान्यावर आमदार राहुल कुल यांची एक हाती सत्ता आहे. त्यांनी या वीस वर्षाच्या कालावधीत कारखान्याची पुरती वाट लावली आहे. मागील तीन वर्षापासून कारखाना बंद आहे. हा कारखाना यापुर्वी कधीही बंद पडला नव्हता. मग कुल यांच्या कालावधीतच कसा काय बंद पडला? याचे उत्तर कुल यांनी द्यावे.

कारखान्याच्या कारभाराची स्थापनेपासून चौकशी करावी ही मागणी म्हणजे संस्थापक कै. मधुकर (काका )शितोळे यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यासारखे आहे. कुल यांनी कै. मधुकर (काका) शितोळे यांची बदनामी करू नये. ती सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

३० ऑक्टोबर १९८० ला भीमा पाटसचा पहिला अग्नि प्रज्वलन कार्यक्रम संपन्न झाला होता. आमदार राहुल कुल यांनी कारखान्याची सुत्रे ताब्यात घेतल्यापासूनच कारखान्यामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. कारखान्यावर विविध बॅंकांचे कर्ज काढून त्या पैशातूनच कुल यांनी विधानसभा निवडणुका लढवली आहे.

असा आरोप सत्वशील शितोळे यांनी केला. कै. मधुकर (काका) शितोळे यांच्या ताब्यातून कारखाना गेल्यानंतर सर्व कर्ज निल करून तब्बल साडेसोळा कोटी रुपये शिल्लक होते. माजी आमदार आणि राहुल कुल यांचे वडील स्वर्गीय सुभाष कुल हे कारखान्याचे अध्यक्ष तर माजी आमदार रमेश थोरात हे उपाध्यक्ष झाले होते.

कारखाना स्थापनेपासून आतापर्यंत फक्त तीनच जण कारखान्याचे अध्यक्ष झाले आहेत. यामध्ये मधुकर शितोळे सोडले तर कुल यांच्याकडेच कारखान्याची सत्ता राहिली आहे. स्वर्गीय सुभाष कुल यांच्या कालावधीतही कारखाना अत्यंत चांगल्याप्रकारे चालला होता.

कारखान्याची कर्जांची वेळेवर परतफेड होत होती. कामगारांना वेळेवर पगार दिले जात होते. ऊस उत्पादक सभासदांना एफआरपी प्रमाणे ऊस दर त्यांच्या खात्यावर जमा होत होते. अत्यंत चांगल्या पध्दतीने कारखाना चालु असताना सुभाष कुल यांच्या निधनानंतर राहुल कुल यांना अकरा महिन्यासाठी सहानुभूतीपोटी अध्यक्ष करण्यात आले.

मात्र त्यांनी मागील वीस वर्षात उस उत्पादक सभासद, कामगार आणि संचालकाचा मोठा विश्वासघात केला. मागील तीन वर्ष झाले कारखान्याचे गाळप बंद आहे. कारखाना सुरू करू अशा फक्त आश्वासनाच्या वल्गना आमदार कुल हे करीत आहेत. केवळ ऊस उत्पादक सभासदांचे दिशाभुल करण्याचे काम ते करीत आहेत.असा आरोप शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

कै.मधुकर (काका) शितोळे यांनी अपार कष्टाने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितासाठी हा कारखाना उभा केला आहे. आणि त्यांच्यावर बदनामी कारक विधाने वर्तमान पत्रातून करणे आमदार कुल यांना शोभत नाहीत. केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हा केवीलवाना प्रयत्न करू नये.

तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद,कामगार हे सुज्ञ आहेत. त्यांना या सर्व गोष्टी चांगल्याप्रकारे माहिती आहेत. तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांसाठी, कामगारांच्या हितासाठी आणि भीमा पाटसच्या उज्जवल भवितव्यासाठी कारखाना हा चालु झाला पाहिजे अशी अपेक्षा सभासदांची आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना ही शेतकरी,कामगार यांच्या मालकीची संस्था आहे. आणि ही संस्था वाचविण्यासाठी आणि कारखाना पुन्हा चालू करण्यासाठी तालुक्यातील सभासदांनी राजकारण विरहित पणे एकत्र आले पाहिजे. सर्व पक्षीय राजकीय जोडे बाजूला ठेऊन प्रयत्न केले पाहिजेत.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा पाटसच्या प्रश्नाकडे लक्ष घातले पाहिजे, असे मत योगेंद्र शितोळे व सत्वशील शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर, अॅड.दौलत ठोंबरे, सचिन वरघडे उपस्थित होते. दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने काही दिवसांपुर्वी जिल्हा बॅकेने कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना कारखाना जप्तीची नोटीस पाठवली आहे.

तेव्हापासून कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल आणि जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाने तालुक्याचे राजकरण पुन्हा एकदा पेटले आहे. असे असतानाच आता आमदार कुल यांच्या विधानाने भीमा पाटसचे सस्थांपक अध्यक्ष कै. मधुकर शितोळे यांचे चिरंजीव सत्वशितोळे आणि पुतणे योगेंद्र शितोळे हे प्रथमच एकत्र आले आहेत.

Next Post

अपुर्‍या संख्याबळामुळे राजगड पोलिसांची होतेय दमछाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group