मुंबई : महान्यूज लाईव्ह
तब्बल दोन महिन्यानंतर देशांतर्गत उड्डाणांना परवानगी दिल्यानंतर विमान कंपन्यांनी बुकींग तर केली. मात्र पूर्वनियोजन ढासळल्याने पहिल्याच दिवशी ६३० उड्डाणे रद्द झाली. ३९ हजार प्रवाशांनी प्रवास केला, मात्र दुसऱ्या दिवशी देखील ४० उड्डाणे रद्द झाली.
२६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश वगळता महाराष्टासह देशभरात देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू झाली. पण या पहिल्याच दिवशी विमान सेवेला नियोजनाचा फटका बसला.
केंद्र सरकारने संपूर्ण नियोजन केल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात विमान कंपन्यांची विस्कळीत सेवा राहील्याने प्रवाशांनाही मनस्ताप झाला.











