बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून आज माळेगावातील एका जणास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील रहिवासी असलेली माळेगाव येथील 37 वर्षीय व्यक्ती सहा दिवसांपूर्वी माळेगाव येथे राहण्यास आला होती. त्यास घशाचा त्रास सुरू झाल्याने काल (ता.11) बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयात तपासणी करून त्याच्या घशाच्या द्रवाचे नमुने घेतले होते. त्याच्या तपासणीत त्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बारामती करोनामुक्त करण्याच्या प्रक्रियेत लोकांनी संयम ठेवून यश मिळवले, मात्र ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अर्थात यानिमित्ताने पुण्या- मुंबईतून लाँकडाऊन असतानाही लोक येत असल्याचे या घटनेतून दिसत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.










